Breaking News

 

 

कुख्यात ‘एस. एस.’ गँँगवर हद्दपारीची कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात गुन्हेगारी कृत्यांनी उच्छाद मांडलेल्या आणि दहशत माजविलेल्या एस. एस. तथा सूरज साखरे टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या टोळीचा म्होरक्या सूरज साखरे असून त्याच्या टोळीत युनूस मुजावर, फारुख शिकलगार, कयुम डांगे, प्रसाद रणदिवे, जमीर मणेर, इम्रान मुजावर आणि इम्रान मणेर या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या आठही जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी आज (बुधवार) या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

कोल्हापूर शहरात खून, मारामारी, खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण, खंडणी अशा गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सतत दहशत निर्माण करणाऱ्या एस.एस गॅंगला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्यावतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकजे प्रस्ताव सादर केला होता. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या टोळीतील सदस्यांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

546 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग