Breaking News

 

 

ब्रिटिश अभिनेत्री साकारणार ‘जेम्स बाँड’… : निर्मात्यांचा अभिनव प्रयोग

मुंबई (प्रतिनिधी) :  हॉलिवूडमधील गाजलेल्या बॉन्ड सिरीजच्या २५ व्या चित्रपटात ब्रिटीश सीक्रेट एजंट जेम्स बाँडची भूमिका या वेळी कोणी अभिनेता नव्हे, तर एक अभिनेत्री साकारणार आहे. बॉन्डफेम अभिनेता डेनियल क्रेगच्या जागी आता ब्रिटीश अभिनेत्री लशाना लिंच ही बाँडच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून क्रेग एका हेराच्या रुपात अनपेक्षित एंट्री घेणार असल्याचेही म्हटले जात आहे.

लशानाने यापूर्वी ‘कॅप्टन मार्वल’ या चित्रपटात ‘मारिया राम्बेऊ’ ही पायलटची भूमिका साकारली होती.  या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे ००७ च्या रुपातील तिचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी आता प्रेक्षकही उत्सुक आहेत. 

इटली आणि युनायटेड किंगडम या ठिकाणी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ लशानाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्या भूमिकेसाठीची आणि पर्यायी चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट यूके आणि भारतात एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

288 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग