Breaking News

 

 

चांद्रयान-२ याच आठवड्यात झेपावणार अवकाशात

श्रीहरीकोटा (वृत्तसंस्था) : मागील दोन दिवसापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे इस्त्रोने चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द केले होते. मात्र आता येत्या दि.२१ किंवा २२ जुलै रोजी चांद्रयान-२ अवकाशात झेपावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो या दोन तारखांवर विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलैला होणाऱ्या उड्डाणावेळी  क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली. त्यामुळे ५६ मिनिटे आधीच उड्डाण रद्द करण्यात आले.

२१ जुलै रोजी (रविवार) दुपारी किंवा २२ जुलैची मध्यरात्रीची वेळ उड्डाणासाठी ठरवली जाऊ शकते. इस्त्रोने अद्याप प्रक्षेपणाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. GSLV MK ३ प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण नेमकी कुठे निर्माण झाली होती. ते इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे.

इंधन आणि ऑक्सिडायझर दबाव निर्माण करण्यासाठी हेलियम गॅस बॉटलचा वापर केला जातो. चांगली बाब म्हणजे गळती दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण रॉकेट खोलण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जुलै महिन्यातच पुन्हा चांद्रयान-२ चे अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे असे एका वरिष्ठ वैज्ञानिकाने माध्यमांशी बोलताना सांगितले.

सध्या इस्त्रोचे वैज्ञानिक हे कशामुळे घडलं ते शोधून काढण्यावर मेहनत घेत आहेत. चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द करण्याइतपत ही गळती गंभीर नव्हती पण, इस्त्रोने कुठलाही धोका न पत्करता लगेचच उड्डाण रद्द केलं. चांद्रयान-२ ९७८ कोटींचा प्रकल्प असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत चौथा क्रमांकाचा देश ठरणार आहे.

573 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग