Breaking News

 

 

करण जोहर, हृतिक रोशन ‘मुव्ही माफिया’च ! : कंगना भडकली

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड कलाविश्वातील प्रसंगावर भाष्य करत ‘मुव्ही माफिया’ अशा शब्दात चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, हृतिक रोशन यांच्यावर निशाणा साधला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करु तिने आणखी एका वादाला नवीन वळण दिलं आहे.

(जाहिरात – ✍🏼  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

  अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

  २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

  ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

  पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.  फोन – (०२३१) २६२७५७९)

हिंदी कलाविश्वात माध्यमांचा असा एक गट आहे. ज्याच्यावर ‘मुव्ही माफियां’चं नियंत्रण आहे, असं ठाम मत तिने मांडले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रानौत हिची एका पत्रकाराशी बाचाबाची झाली होती. यावर तिने पत्रकारांनी एखाद्या गोष्टीचं निरिक्षण केल्यानंतर जे पटलं नाही त्याची निंदा करणं हे त्यांचे काम असल्याचे म्हटले आहे.

यावेळी महेश भट्ट, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतच्या वादावरही तिने प्रतिक्रिया दिल्या. नि:स्वार्थ व्यक्तींची बॉलिवूडमध्ये कमतरता असल्याचे म्हणत महेश भट्ट यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याची खंत नाही. मी जे काही केलं, ते योग्यच केलं असंही तिने म्हटले आहे.

762 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग