Breaking News

 

 

‘सावरकरांच्या ‘जन्मठेप’पासून प्रेरणा घेऊन कॅन्सरवर मात करू शकलो…’

मुंबई (प्रतिनिधी) : डिसेंबरमध्ये मला अचानक बरं वाटेनासं झालं आणि कर्करोगाचं निदान झालं. प्रथम पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. पण स्वा. सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचून जगण्याची प्रेरणा मिळाली. सलग सहा महिने योग्य उपचार झाल्यानेच मी या दुर्धर रोगावर मात करू शकलो, असे ज्येष्ठ नेते शरद पोंक्षे यांनी म्हटलंय. पोंक्षे यांनी प्रथमच माध्यमांसमोर येत कर्करोगावर कशा पद्धतीने मात केली, ते सांगितले.  

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

विविध भूमिका लीलया साकारलेले गुणी, ज्येष्ठ अभिनेते आणि कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले शरद पोंक्षे मागील काही महिन्यांपासून जणू अज्ञातवासातच होते. नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांत ते दिसून येत नव्हते. यामुळे त्यांच्या चाहत्यांत अस्वस्थता पसरली होती. पोंक्षे यांना कर्करोग झाल्याचे निदान डिसेंबरमध्ये झाले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. तब्बल सहा महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी या दुर्धर आजाराशी कसा संघर्ष केला हे सांगितले.

ते म्हणाले की, माणसाच्या आयुष्यात काही संकटं अचानक येतात. डिसेंबरमध्ये मला अचानक कर्करोगाचं निदान झालं. मला त्या गोष्टीची प्रसिद्धी नको होती. म्हणून मी कुठेही सोशल मीडियावर फोटो टाकला नाही. मला खोटी सहानुभूती नको होती. हा काळ फार भयंकर होता. कारण २५ वर्षांत एकही दिवस रजा न घेता काम केलंय. उपचाराच्या कालालात मला पहिले तीन महिने तर उंबरठाही ओलांडायचा नव्हता. हे मला सहन होण्यासारखे नव्हते. मी सावरकरप्रेमी आहे. त्यांच्या ‘जन्मठेप’ पुस्तकाने मला प्रेरणा दिली. जर अकरा वर्ष एका छोट्या खोलीत साखळदंडाने बांधलेला माणूस आपल्या देशासाठी एवढं काही करू शकतो, तर मला तर फक्त सहा महिने त्रासातून काढायचे होते तेही माझ्यासाठी. सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे या आजारातून पूर्णपणे बरे झालो आहे.  आता मी ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येत आहे.

375 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग