Breaking News

 

 

सम्राटनगर येथे अज्ञात चोरट्याकडून चारचाकी वाहन लंपास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सम्राटनगरमध्ये घराच्या समोर लावलेली चारचाकी वाहन एका अज्ञात चोरट्याने चोरली. संभाजी दिनकरराव काटे (रा. सम्राटनगर) येथे एका अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांनी आपले चारचाकी वाहन (एमएच ०९ बीएम ४९५९) अपार्टमेंट  समोर लावली होती. ही गाडी अज्ञातांनी चोरुन नेली. या गुन्ह्याची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली आहे.

213 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग