Breaking News

 

 

उशिराचे शहाणपण ! : पाकिस्तानने खुले केले हवाई क्षेत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हल्ला केला होता. याच्या निषेधार्थ पाकिस्तानने प्रवासी वाहतूक करणाऱ्या भारतीय विमानांना आपल्या हा हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यात बंदी घातली होती. यामुळे भारताचे आणि पाकिस्तानचेही नुकसान होत होते. आता उशिरा का होईना, तब्बल १३९ दिवसानंतर पाकिस्तान सरकारला शहाणपण सुचले आहे. पाकिस्तानने ही बंदी उठवली आहे.

पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने हवाई क्षेत्र सर्व नागरी विमानांसाठी खुले केले असल्याची नोटीस जारी केली आहे. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र हे एक महत्त्वाचा हवाई मार्ग आहे. या मार्गावरून दिवसभरात हजारो प्रवासी आणि मालवाहतूक करणारी विमाने प्रवास करत असतात. एअर स्ट्राईकनंतर भारताच्या कोणत्याच विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करता येत नव्हता. त्याचा थेट परिणाम अनेक विमान कंपन्यांना बसत होता.

पाकिस्तानची हवाई हद्द वापरता येत नसल्यामुळे विमानांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत होता. अन्य मार्गाचा वापर करताना इंधनाबरोबर खर्च देखील जास्त वाढत होता. महत्त्वाचे म्हणजे या बंदीचा फटका सर्वात जास्त पाकिस्तानलाच बसत होता.

351 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग