Breaking News

 

 

‘सीपीआर’मध्ये रांगाच रांगा ! : प्रशासनाची तारांबळ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे अनेकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे­­­. खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. गरिबांचा दवाखाना म्हणून ओळखले जाणारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात तर रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे.  

पाऊस, वारा, थंडी, ऊन अशा संमिश्र वातावरणामुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. त्यातच शहराच्या काही भागात डेंग्यूची साथ आहे. सर्दी, ताप खोकल्याने अनेक जण त्रासून गेले आहेत. शहर आणि उपनगरात असलेल्या छोट्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. मात्र छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रुग्णांची तुडुंब गर्दी होत आहे. केसपेपर काढण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. डेंग्यूसह अन्य जलजन्य साथीची शक्यता लक्षात घेऊन सीपीआर प्रशासनाने रुग्णांना दाखल करून उपचार करण्यास सुरुवात केली.

रुग्णांची संख्या मोठी असल्याने अनेक रुग्णांवर जागा मिळेल तिथे गाद्या टाकून उपचार केले जात आहे. उपचारासाठी शहरासह उपनगरे, शहराशेजारच्या गावातील रुग्ण सीपीआर मध्ये येत आहेत. त्यामुळे सीपीआर प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

1,850 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग