Breaking News

 

 

कतरिनाचा हॉट अवतार पाहून चाहते घायाळ…

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने आपल्या काही फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडिया अकाउंटवर शेअरही केले आहेत. यामध्ये तिचा मल्टी कलर बिकीनीमधला फोटो सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.  कतरिनाचा हा फोटो पाहून तिचे चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

फक्त चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केले आहे. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने तिच्या फोटोवर कमेंट करताना दोन हार्टचे इमोजी शेअर केले. तर फराह खानने तिला चक्क तू बारा वर्षांची मुलगी वाटतेस, असं लिहिले आहे. दिग्दर्शिका झोया अख्तरने, आनंदी मुली नेहमीच सुंदर दिसतात, अशी कमेंट केली आहे.

कतरिना आता लवकरच रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

2,787 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग