Breaking News

 

 

पावसाळी ओपन रोलर स्केटिंग स्पर्धेत १४५ खेळाडूंचा सहभाग…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्पीड रोलर स्केटिंग अकॅडमी आणि दुर्वास कदम बापू युवामंच, कोल्हापूर यांच्यावतीने पहिल्या पावसाळी ओपन रोलर स्केटींग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन दुर्वास कदम, डॉ. दिलीप यादव, माजी नगरसेविका सौ. वैशाली कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

ही स्पर्धा इंडियन कॉड आणि इनलाईन २८ ग्रुपमध्ये झाल्या. यामध्ये इंडियन स्टेटस या स्पर्धेत मुला-मुलींनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ दुर्वास कदम, माजी नगरसेविका वृषाली कदम, उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्पर्धेत रेफ्रिरी म्हणून सचिन इंगवले, सुजय पवार, विनायक पाटील, सत्यम पाटील, राम कांबळे आदींनी काम पाहिले.

261 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग