Breaking News

 

 

राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेने गाठला २७९ कोटींच्या ठेवीचा टप्पा : एम. पी. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्व. विक्रमसिंह राजेंच्या आशिर्वादाने आणि शाहू ग्रुप पुणे म्हडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे बँकेच्या गेल्या दोन वर्षात तब्बल साठ कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच या बँकेने २७९ कोटींचा ठेवीचा टप्पा गाठला असल्याचे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील यांनी सांगितले. ते कागल येथे बँकेच्या वार्षिक सभेत बोलत होते.

एम.पी.पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षात बँकेच्या ठेवीत जवळपास साठ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ठेवीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. योग्य आणि पात्र गरजूंना कर्जाचे वाटप केले त्याला एनपीए शून्य टक्के आहे. बँकेचा ऑडिट वर्ग अ कायम असून बँकेची आर्थिक वर्षांची तपासणी रिझर्व्ह बँकेने पूर्ण केली आहे. त्यांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी सभेत मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे अभिनंदन केले.

शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण, संचालक आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब हुच्चे, चंदर गाडीवड्ड, प्रकाश पाटील, रविंद्र घोरपडे, रणजीत पाटील, विशाल पाटील, उमेश सावंत, कल्पना घाटगे, अऩिल मोरे, अॅड. बाबासाहेब मगदूम, शाहू ग्रुपचे पदाधकारी, सभासद उपस्थित होते.

612 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग