Breaking News

 

 

कोहलीला भोवणार ‘वर्ल्ड कप’मधील पराभव… : बीसीसीआय घेणार कठोर निर्णय !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून झालेला पराभव सर्वानाच जिव्हारी लागला आहे. बीसीसीआयही विराट कोहली – रवी शास्त्री यांचेवर नाराज असून भारतीय संघात अनेक फेरबदल केले जाऊ शकतात. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  विराट कोहलीकडून वनडे आणि टी-20 कर्णधारपद काढून घेऊन रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवली जाणार आहे, तर कसोटी कर्णधारपदी कोहली कायम असेल. धोनीला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

(जाहिरात – ✍🏼  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

  अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

  २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

  ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

  पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.  फोन – (०२३१) २६२७५७९)

या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, आता जे होऊन गेले, त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही, आता पुढचा विचार करायला हवा. हीच वेळ आहे की, आपल्याला २०२३ ची वर्ल्डकपची तयारी सुरू करावी लागेल. संघाच्या कामगिरीवर विचार करून रणनीती आखली पाहिजे. आम्हाला माहिती आहे की, संघात काही बदल करण्याची गरज आहे. संघाला आणखी चांगले बनवण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होईळ. ही चांगली वेळ आहे की, रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद सांभाळावे आणि यासाठी मानसिक तयारी करावी. यासाठी सध्याच्या कर्णधाराने आणि निवड समितीने सपोर्ट करायला हवा. यावेळी या अधिकाऱ्याने विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये वाद असल्याच्या वृत्ताचे खंडन केले.

1,203 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग