Breaking News

 

 

शिवीगाळ केल्यास व्हॉट्सअॅप देणार झटका…

सॅनफ्रान्सिस्को (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअॅप नेहमी नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअॅप आपल्या अकौंटवरून शिवीगाळ, अपशब्द वापरणाऱ्यांना चाप लावणार आहे. अशी कृत्ये करणाऱ्याचे अकौंट त्वरित डिलीट केले जाणार आहे. हे फिचर यंदाच्या डिसेंबरपासून अमलात येणार आहे.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

जगभरात व्हॉट्सअॅपवरून चिथावणीखोर विधाने, संदेश, शिवीगाळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दंगली, अनुचित प्रकाराचे प्रमाण वाढले होते. अनेक सरकारांकडून याबाबत व्हॉट्सअॅपला नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळेच व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचलले आहे.

ग्लोबल मेसेजिंग प्लॅटफार्म व्हॉट्सअॅपने आता मशीन लर्निंग तंत्राने चिथावणीखोर संदेश व अपशब्द वापरणाऱ्यांना ओळखून काढणार आहे. सातत्याने सेवा व अटींचे उल्लंघन करणाऱ्याचे अकाउंट त्वरित डिलीट करणार आहे. कंपनीने या वर्षांच्या सुरुवातीलाच नियमाचे उल्लंघन करणाऱ्या युजर्सवर कारवाई करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात व्हॉट्सअॅपचे १५० कोटी युजर्स आहेत. फेसबुकचे स्वामित्व असलेल्या व्हॉट्सअॅपने शनिवारी सांगितले, आम्ही हा प्लॅटफार्म वैयक्तिक, खासगी संदेश पाठवण्यासाठी तयार केले. त्याचा गैरवापर करण्यासाठी नाही. ऑटोमेटेड मेसेजिंग थांबवू तसेच दरमहा २० लाख अकाउंटवर बंदी आणू. हे तंत्र डिसेंबर २०१९ पासून अमलात येईल.

1,125 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग