Breaking News

 

 

षण्मुगम चषक : फुले, क्रिएटिव्ह, रेडेकर स्कूलची विजयी सलामी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शालेय फुटबॉल स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला.  चौदा वर्षे वयोगटात क्रिएटिव्ह स्कूल, सर्वोदया स्कूल,केदारी रेडेकर  पब्लिक स्कूलने आपला विजय नोंदवला. तर सतरा वर्षे गटात साधना हायस्कूल, जागृती हायस्कूल, गडहिंग्लज हायस्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

माजी क्रिडाशिक्षक अप्पासाहेब कोले, अजित क्रीडा मंडळाचे संस्थापक रुद्रप्पा हत्ती आणि पंच षण्मुगम (पुणे) यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा एमआर हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेत चौवीस संघांनी सहभाग घेतला आहे. अल्ताफ शानेदिवान यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ झाला.

१४ वर्षे वयोगटात क्रिएटिव्ह स्कूल ब ने  नवोदित बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाला टायब्रेकरमध्ये २-१ असे नमविले. सर्वोदयास्कूलने नवख्या लोटसवर २-० अशी मात केली. केदारी रेडेकर पब्लिक स्कूलने गिजवणे हायस्कूलचा ४-० असा मोठा पराभव केला. तर चुरशीच्या सामन्यात सावित्रीबाई फुले विद्यालयाने टायब्रेकरमध्ये शिवराज स्कूलला ३-२ असे हरवले.

सतरा वर्षे वयोगटात गडहिंग्लज हायस्कूलने दुबळ्या जागृती हायस्कूल ब संघाचा सहा शुन्य असा धुव्वा उडविला. रंगतदार झालेल्या सामन्यात जागृती अ ने क्रिएटिव्हला ३-२ असे पराजित केले. साधना हायस्कूलने सर्वोदयाचा २-०  ने नमवले. या सामन्यांसाठी ओंकार सुतार, सागर पवार, रितेश बदामे हे पंच म्हणून काम पाहत आहेत.

यावेळी युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बारदेस्कर, संचालक संभाजी शिवारे, भैरू सलवादे, क्रिडाशिक्षक सुतार, प्रदीप पाटील, गौस मकानदार, अक्रम जमादार, सुलतान शेख, कुलदीप चव्हाण उपस्थित होते. 

564 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग