Breaking News

 

 

ऑस्ट्रिया येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरचे यश…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑस्ट्रिया येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धा कोल्हापूरातील ११ स्पर्धकांनी यशस्वीरीत्या पार केली. त्यामुळे कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर गेले आहे. हे सर्व स्पर्धक आज (रविवार) शहरात दाखल झाले. त्यांच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ताराराणी पुतळ्याजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले.

या स्पर्धेत ३.८ किलोमीटर स्विमिंग, १८२ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर रनिंग हे संपूर्ण १७ तासांच्या आत पूर्ण केली तरच त्याला आयर्नमॅन ही पदवी मिळते. या स्पर्धेत वरून कदम, अमर धामणे, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवानी, उदय पाटील, बेळगावकर, बाबासाहेब पुजारी अशा अकरा स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांनी दोन वर्षे कठोर सराव केला होता.

यावेळी आयर्न मॅन सत्कार समितीचे अध्यक्ष जयेशभाई कदम, मिलिंद कणसे, संजय कदम, एस. आर. पाटील, अॅड. राजेंद्र किंकर, सचिन तोडकर , दिलीप देसाई, राजू लिंग्रज, बाळासाहेब मुधोळकर, गणी आजरेकर, रत्नेश शिरोळकर उपस्थित होते.

687 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग