Breaking News

 

 

पहिल्याच दिवशी ‘सुपर ३०’ ची कमाई ११ कोटींवर…

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास ११.८३ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि. सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

सुपरहिरोची भूमिका साकारणाऱ्या हृतिकने ‘काबिल’मध्ये एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला अनेक चाहत्यांची पसंती मिळाली. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रकारची, शिक्षकाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या हृतिकला याही भूमिकेसाठी प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे.

या आठवड्यात ‘सुपर ३०’ सोबत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे आज शनिवारी आणि रविवारमध्ये चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपट समिक्षकांकडूनही चित्रपटाला चांगले रेटिंग्ज देण्यात येत आहेत. चित्रपटाचे कथानक अनेक तरुणांच्या पसंतीस उतरत असल्याचेही समोर येत आहे.

‘सुपर ३०’ हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक बिहारमधील सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. हृतिकच्या आतापर्यंत आलेल्या चित्रपटातील भूमिकांपेक्षा या चित्रपटातील भूमिका अतिशय निराळी आहे.

699 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग