Breaking News

 

 

‘यामुळे’च आता भारतात आयफोन मिळणार स्वस्तात..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात स्मार्टफोनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आयफोन खरेदी करणे हे तरुणाईचे स्वप्न असते. मात्र आयफोन इतर फोनच्या तुलनेत अत्यंत महाग असल्याने सर्वसामान्यांना तो खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता हे आयफोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये निर्मिती झालेले आयफोन पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतात. त्यामुळे आयफोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारी दरबारी काही मंजूरी मिळणे बाकी आहे. असे झाल्यास आयफोन एक्सएस आणि एक्सआरच्या किमती कमी होऊ शकतात.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार फॉक्सकॉन कंपनी अॅपलसाठी भारतात फोनची निर्मिती करतात. भारतामध्ये आयफोन एक्सआरची किंमत ५६ हजारपासून सुरूवात होते तर एक्सएसची १ लाखापासून. भारतामध्ये आयफोन आयात केले जातात. त्यावर २० टक्के  आयात शुल्क लावले जात होते. परंतु आयफोनची निर्मिती भारतात सुरू झाल्यास आता ग्राहकांचे भरपूर पैसे वाचू शकतात.

हिंदुस्थान ही जगातील्या दुसर्‍या क्रमाकांची स्मार्टफोनची बाजारपेठ आहे. तसेच भारतामध्ये आयफोन हा लोकप्रिय आहे, परंतु तो महाग असल्याने त्याचा मोठा ग्राहकवर्ग नाही. त्यामुळे त्याचा बाजारपेठेतील वाटा फक्त १ टक्का आहे.

2,388 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग