Breaking News

 

 

‘अॅस्टर आधार’मध्ये मेंदू विकारावर उपचाराची सोय : डॉ. आनंद मोटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये मेंदू शस्त्रक्रिया, मेंदू विकार रेडिओलॉजी, इंटरनॅशनल रेडिओलॉजी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी मेंदू तज्ञ, मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ, रेडिओलॉजिस्ट इंटरनॅशनल आणि फिजिओथेरपीस्टची टिम २४ तास उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना त्याचा कायमस्वरुपी लाभ होणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोटे यांनी आज (शुक्रवार) दिली.

काही दुर्घटना झाल्यास लगेच रुग्णांना मिळणारे वैद्यकीय उपचार खूप महत्वाचे असतात. स्ट्रोक, फिट्स, मेंदूला मार लागणे अशावेळी तातडीने उपचार करणे शक्य झाले आहे. अपघाती मेंदूला इजा झाल्यामुळे अशा रुग्णांना तातडीने उपचारासाठी गरज असते. साधारण गेल्या वर्षभरातून शंभर अधिक रुग्णांच्या मेंदूचे तातडीने ऑपरेशन करून त्यांचे प्राण वाचले आहेत.

डॉ. मन्सूर अली खान यांनी स्पाईन क्लिनिक सुरु करणार असल्याचे सांगून यामध्ये हाता-पायात मुंग्या येणे, पाय जड होणे, कंबर दुखणे यावर उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी दर शुक्रवारी मणक्याच्या आजारावर तपासणी व उपचार केले जाणार असल्याचे सांगितले .

डॉ. स्नेहल स्नेहल दत्त खाडे यांनी इपीलिप्सी क्लिनिक सुरु करणार असून यामध्ये फिट्स, अपस्मार, आकडी यासारख्या आजारावर दर बुधवारी सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

450 total views, 3 views today

One thought on “‘अॅस्टर आधार’मध्ये मेंदू विकारावर उपचाराची सोय : डॉ. आनंद मोटे”

  1. जे जाहीर करतात त्या प्रमाणे प्रत्यक्ष कृती करणं महत्त्वाचे आहे तरच त्याला अर्थ रहातो…………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग