Breaking News

 

 

पाचगावच्या जवानाचा लखनौ येथे मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सैन्यदलाच्या १७ मराठा बटालियनमध्ये हवालदार पदावर सेवा बजावत असलेले दत्तात्रय आनंद कारंडे (रा. गाडगीळ कॉलनी, शांतीनगर, पाचगाव, ता. करवीर) यांचा लखनौ येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी (दि. १०) मृत्यू झाला. ते काविळीने आजारी होते.   

जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंडे यांचे मूळ गाव बेले (ता. राधानगरी) आहे. ते मागील १९ वर्षांपासून लष्करामध्ये सेवा बजावत होते. काही दिवसांपासून ते काविळीने आजारी होते. त्यांच्यावर लखनौ येथील सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव उद्या (शुक्रवार) सकाळी पाचगाव येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर बेले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

243 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा