Breaking News

 

 

मराठा आरक्षणामुळे ‘ओबीसीं’मध्ये भीती… : प्रकाश आंबेडकर 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र या आरक्षणामुळेच ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ही भीती दूर करण्यासाठी कोणताच पक्ष प्रयत्न करीत नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नवी दिल्ली येथे आज (गुरुवार) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या वेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र, ही भीती दूर करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा किंवा शिवसेना कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने अ आणि ब अशी वर्गवारी करून मराठा समाजाला ब वर्गात टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. 

ओबीसी आरक्षण शाबूत ठेवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या. तरच देशातील सर्व घटकांचे आरक्षण टिकेल. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण देऊ, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

348 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा