Breaking News

 

 

‘फोर्ब्स’च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत ‘खिलाडी’चा समावेश…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  :  ‘फोर्ब्स’ने जगभरातील वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये अभिनेता अक्षय कुमारने बाजी मारली आहे. भारतीय कलाकारांत अक्षय कुमार ‘फोर्ब्स’च्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीतील एकमेव आहे. या यादीमध्ये अक्षय कुमार ३३ व्या क्रमांकावर आहे.

अक्षयने एका वर्षात ६५ मिलियन डॉलर इतकी कमाई केली आहे. अक्षयच्या या कमाईने बॉलिवूड कलाकारांनाच नाही तर हॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकले आहे. हॉलिवूडच्या रिहाना, जॅकी चैन, ब्रेडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही त्याने पिछाडीवर टाकले आहे. 

तर फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे. टेलर स्विफ्टची गेल्या वर्षीची कमाई १८५ मिलियन (जवळपास १,२६४ कोटी) इतकी होती. टेलर स्विफ्ट २०१६ पासून या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मॉडेल काइली जेनर आहे. अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट तिसऱ्या क्रमांकावर, अर्जेंटीनाचा प्रसिद्धी फुटबॉलपटू लियोन मेसी चौथ्या तर ब्रिटिश गायक एड शीरन पाचव्या क्रमांकावर आहे.

417 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा