Breaking News

 

 

गारगोटी – पाटगांव रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास आंदोलन : जीवन पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी ते पाटगांव मार्गातील जोतीबा चौक, आझाद चौक या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खडड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे या मार्गातील खड्डे  लवकरात लवकर बुजवावे अन्यथा, याच खडड्यात वृक्ष लागवड करून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी  भुदरगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता  बी. आर. कांबळे यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी – पाठगांव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा आहे की, खड्ड्यात रस्ता आहे हे न समजण्यासारखी परिस्थितीत निर्माण झाली आहे. हा खड्डा जवळपास एक-एक फुट इतका खोल पडला आहे. त्यामुळे आता तर पावसाला असल्याने वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनधारकांना अंदाज लावणे देखील मुश्कील झाले आहे.

जोतीबा चौक, आझाद चौकामधील खडड्यामुळे प्रवासी वर्ग, विद्यार्थी व सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात  लवकर खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रंगराव देसाई, पांडुरंग शिंदे, किशोर हिलगे, सदाशिव हळदकर, संदिप पाटील, अभिजित किल्लेदार, तानाजी माने उपस्थित होते.

1,191 total views, 6 views today

One thought on “गारगोटी – पाटगांव रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास आंदोलन : जीवन पाटील”

  1. निवडणूक तोंडावर आल्यावर हे सुचते नेते लोकांना… एका आमदार ने पण असेच केले.. अनेक आमदार असेच गेले. 5वर्ष मागे काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा