Breaking News

 

 

हताश चंद्राबाबू आता ‘टीडीपी’ करणार ‘या’ पक्षात विलीन ?

हैदराबाद (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांना पराकोटीची सत्ताकांक्षा असल्याचे सर्वश्रुत आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. एके काळी ‘एनडीए’चे निमंत्रक असलेल्या नायडू यांनी दोन वर्षांपूर्वी ‘एनडीए’ची साथ सोडली आणि मोदींविरोधात आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला. त्यामुळे हताश झालेल्या चंद्राबाबू नायडू यांनी चक्क आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरु केल्याचे वृत्त आहे.

या चर्चेला खुद्द तेलगू देसम पक्षाच्याच माजी आमदाराने दुजोरा दिला आहे. जे. सी. प्रभाकर रेड्डी यांनी अनंतपुरम इथे माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की राजकारणात सदैव काळ कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा शत्रू नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चंद्राबाबू नायडू यांच्याकडे असलेल्या अनुभव आणि नव्या विचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे नायडू हे तेलुगू देसम पक्ष भाजपमध्ये विलीन करू शकतात.

या संभाव्य विलीनीकरणाला आणखी एक किनार आहे. विधानसभा निवडणुकीत  त्यांच्या टीडीपीचा ‘वायएसआर’ पक्षाने धुव्वा उडवला. आता त्यांचे मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डी यांची सत्ता आली आहे. पदभार स्वीकारताच जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबूंचा ‘सीबीआय’ला आंध्र प्रदेशातील बंदीचा निर्णय उठवला आणि नंतर त्यांच्या बेकायदेशीररित्या बांधलेल्या घरावर हतोडा चालवला आहे. त्यामुळेच नायडू यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचालींना सुरुवात केली असावी, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

612 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा