Breaking News

 

 

भुदरगड तालुक्यातील म्हसवे बंधारा पाण्याखाली…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथील बंधारा वाढत्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. बंधाऱ्यातील पाण्याच्या पातळीने धोक्याची मर्यादा ओलांडल्याने गारगोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि. सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

या मार्गावरुन विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच नागरिक विविध कामानिमित्त गारगोटीत येत असतात. यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्ग म्हणून महालवाडी मार्गे उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वी बांधण्यात आलेला पूल अद्याप वापरात नसल्याने प्रवासी वर्गातुन नाराजीचा सुरू उमटत आहे.

648 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा