Breaking News

 

 

अरुण डोंगळे यांना वगळून नेत्यांनी घेतली ‘गोकुळ’ संचालकांची बैठक !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’चा कारभार संचालक मंडळ चालवते की नेते, असा प्रश्न आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मल्टीस्टेटच्या मुद्द्यावरून मी लोकांच्या बाजूने आहे, असे स्पष्ट करणारे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन अरुण डोंगळे यांना वगळून आज (गुरुवार) गोकुळच्या संचालकांची बैठक पार पडली. संचालक मंडळाची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला? बैठकीला एखाद्या संचालकाला वगळता येते का? सभेची नोटीस त्या संचालकाला पाठवण्याची जबाबदारी कोणाची? एखाद्या संचालकाला हेतुपुरस्सर बाजूला ठेवून बैठक घेतल्यास ती अधिकृत की अनधिकृत? केवळ गोकुळचे नेते म्हणून संचालकांची बैठक बोलावता येते का? ही बैठक गोकुळच्या कार्यालयात कशासाठी? या बैठकीच्या खर्चाचा बोजा कोणावर? बैठकीसाठी राबणारे कर्मचारी नेत्यांचे की गोकुळचे? त्यांना कशासाठी वेठीस धरले जाते आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अरुण डोंगळे यांना वगळून आज दुपारी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क परिसरातील कार्यालायात संचालकांची बैठक पार पडली. त्यांना वगळण्यामागे नेमके कोण आहे? ‘मल्टीस्टेट’ला केवळ डोंगळे यांचा विरोध नाही. तर, जिल्ह्यातील अनेक अन्य नेत्यांचा विरोध आहे. त्यांना कसे गप्प बसवणार? विरोध करणाऱ्याला वगळून नेत्यांना नेमके काय साध्य करायचे आहे? संचालकांची बैठक बोलावण्यात आली, पण ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांना बैठकीचे निमंत्रण दिले गेले नाही. याबाबत विचारणा केली असता  ‘पार्टी मीटिंग’ असल्याचे सांगण्यात आले. मग पार्टी मीटिंग संघाच्या कार्यालयात का आयोजित करण्यात आली, असाही मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.

मल्टीस्टेटमुळे खरोखरच दूध उत्पादक शेतकर्‍यांचा फायदा होणार असेल तर, त्याला ते पटवून का दिले जात नाही की केवळ  गोकुळची दुभती गाय स्वतःच्या ताब्यात ठेवायची हा ‘गोपनीय’ अजेंडा आहे ? एकूणच मल्टीस्टेटचा विषय सोपा करण्याऐवजी तो अधिकच ‘क्लिष्ट’ करण्याचा नेत्यांचा विचार आहे का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारभार पारदर्शक न करता सारा खेळ पडद्याआड का सुरू आहे, सर्वांना सोबत घेऊनच या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे. अन्यथा हा गुंता अधिकच वाढत जाणार आहे.

7,184 total views, 3 views today

3 thoughts on “अरुण डोंगळे यांना वगळून नेत्यांनी घेतली ‘गोकुळ’ संचालकांची बैठक !”

  1. डोंगळे समर्थतनात बातमी दिसते. विधानसभेला प्रमोट करण्याचा विडा उचलला वाटत?

  2. स्वाभिमान गहाण ठेवलेली नेते मंडळी..विचार करा…जनभावना ओळखा..सदैव जनता तुम्हाला लक्षात ठेवेल…
    कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी दूध उत्पादक सभासद आपल्या पाठीशी राहिल…

  3. सर्व सामान्य जनतेचा विचार करा गोरगरिबांच्या हक्काचा संघ त्यांचाच राहू देत मल्टीस्टेट च खूळ डोक्यातन काढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा