Breaking News

 

 

‘निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस ! : दीदींची ‘माही’ला विनंती…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार असल्याची जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात रंगली आहे. काल न्यूझीलंडने केलेल्या पराभवाने भारतीय संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. धोनी आता पुढील विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र धोनीने लगेच निवृत्त होऊ नये, अशी विनंती खुद्द महान गायिका लता मंगेशकर यांनी केली आहे.   

धोनीच्या निवृत्तीच्या विचारानेच त्याचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. त्यामध्ये लतादीदींचाही समावेश आहे. दिदींनी ट्विटरवरून धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. धोनी, तुम्ही निवृत्त होण्याचा विचार करताय अशा चर्चा सध्या माझ्या कानावर येत आहेत. कृपा करून तुम्ही असा विचार करू नका. देशाला अजूनही तुमच्या खेळाची गरज आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की निवृत्तीचा विचार तुमच्या मनात आणू नका’, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.

1,299 total views, 3 views today

One thought on “‘निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस ! : दीदींची ‘माही’ला विनंती…”

  1. संघात खुप मोठी पोकळी निर्माण होईल जी कधीही भरूण येणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा