Breaking News

 

 

कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण मिळाले आहे. भाजप-काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राजीनामा दिलेल्या १० बंडखोर आमदारांनी आज (गुरुवार) संध्याकाळपर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनीही आजच त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले.

बंडखोर आमदारांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात राजीनामे स्वीकारण्याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. तसेच राजीनामा दिलेल्या आमदारांना डीजीपी यांनी सुरक्षा द्यावी, असेही बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जेडीएस-काँग्रेस सरकारला मोठा झटका बसला आहे. कारण आजच राजीनाम्यावर निर्णय घेण्यास बजावण्यात आले आहे. त्यामुळे राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला असला तरी त्यांना अध्यक्षांसमोर उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील हॉटेलमधील मुक्काम आता हलवावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा