Breaking News

 

 

धोनी धावबाद झाला अन् ‘त्याने’ जीव गमावला…

कोलकाता (वृत्तसंस्था) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यामुळे कोट्यवधी चाहत्यांचा हिरमोड झाला. जडेजा आणि धोनी यांनी झुंजार फलंदाजी करीत विजय दृष्टीपथात आणला होता. मात्र ऐनवेळी दोघेही बाद झाले. धोनी बाद झाल्याचा धक्का एका क्रिकेट चाहत्याला सहन न झाल्याने त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार कोलकाता येथे घडला असून श्रीकांत मैती (वय ३३) असे या चाहत्याचे नाव आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता. कोलकातामधील सायकल दुकानदार श्रीकांत मैती (वय ३३) दुकानात बसून मोबाइलवर हा सामना पाहात होता. अखेरच्या ११ चेंडूत भारताला विजयासाठी २५ धावा हव्या होत्या. धोनीला ४९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. तिसऱ्या चेंडूवर दुसरी  धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. धोनी धावबाद होताच चाहत्यांत निराशा पसरली.

श्रीकांतला हा धक्का सहन झाला नाही. चक्कर येऊन तो दुकानात कोसळला. त्याचा दुकानातच मृत्यू झाला. शेजारी असणाऱ्या सचिन घोष याने सांगितले की, सायकलच्या दुकानातून मोठा आवाज आल्याने आम्ही तिथे पोहोचलो. त्या वेळी श्रीकांत खाली पडलेला आम्हाला दिसला. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, त्याला तिथे आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

2,634 total views, 3 views today

One thought on “धोनी धावबाद झाला अन् ‘त्याने’ जीव गमावला…”

  1. के.जी. मुल्ला सर H. M. न्यू इंग्लिश स्कूल मुगळी ता. कागल, जि. कोल्हापूर says:

    Very bad incident for India and Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा