Breaking News

 

 

सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या घरांवर सीबीआयचा छापा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्ली येथील घरांवर सीबीआयने छापे मारले आहेत. लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीमध्ये अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

आनंद ग्रोव्हर आणि इंदिरा जयसिंग हे दोघेही लॉयर्स केलक्टिव्ह नावाची संस्था चालवतात. इंदिरा जयसिंग या २००९ ते २०१४ या कालावधीत एडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर कार्यरत होत्या. या कालावधीत लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेसाठी त्यांनी इतर देशांमधून निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांनी या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही लॉयर्स कलेक्टिव्ह विरोधात करण्यात आलेल्या याचिकेत आहे.

या संस्थेने विदेशी निधीसंदर्भातल्या कायद्याचे उल्लंघन केले आहे हे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संस्थेचा परवाना रद्द केला. ज्यानंतर सीबीआयने या प्रकरणी आनंद ग्रोव्हर आणि लॉयर्स कलेक्टिव्ह विरोधात तक्रार दाखल केली. मात्र आनंद ग्रोव्हर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

423 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा