Breaking News

 

 

गोवा काँग्रेसमध्ये फूट : भाजपमध्ये १० आमदारांनी केला प्रवेश

पणजी (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या ११ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय नेतृत्वावर नाराज होऊन या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर ‘बरे झाले, काँग्रेस स्वच्छ झाली’, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते डिमेलो यांनी व्यक्त केली.

(जाहिरात – ✍🏼  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

  अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

  २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

  ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

  पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर  फोन – (०२३१) २६२७५७९)

गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील काँग्रेसच्या १० आमदारांच्या प्रवेशाची पुष्टी केली आहे. या आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ आता २७ झालं आहे. दि. १८ जुलै रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करणार आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेले आमदार दिल्लीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रप्रमाणे गोव्यामध्ये देखील भाजपच्या गळाला विरोधी पक्षनेता लागला आहे. कारण, विरोधी पक्ष नेता चंद्रकांत कावळेकर यांनी देखील या दहा आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदारांनी केलेल्या प्रवेशामुळे गोव्यातील राजकीय समीकरणं बदलेले आहे. काँग्रेसचं संख्याबळ १५ वरून आता ५ झाले आहे. तर, भाजपचे संख्याबळ आता २७ झालं आहे. शिवाय, गोवा फॉरवर्ड पार्टी ३, महाराष्ट्र गोमांतक पार्टी १, एनसीपी – १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ गोव्यामध्ये पहायला मिळत आहे.

690 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा