Breaking News

 

 

सीपीआरमधील स्वच्छतागृह अस्वच्छ ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांंतून संताप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या सीपीआरमध्ये मधील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. सीपीआरमधील अपघात विभाग आणि पोलीस चौकी यामधील या स्वच्छतागृहामुळे सर्वानाच त्रास होत आहे. यामुळे आधीच शहरात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले असताना या परिसरात इतर साथी पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नसल्याने रुग्णातून संताप व्यक्त होत आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲 संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

सीपीआर म्हणजे गोरगरिबांचा दवाखाना. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्ण हा या दवाखान्यात खूप कमी शुल्कात उपचाराचा लाभ घेण्यासाठी जात असतो. काही रोग हे अस्वछतेमुळे होत असतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सध्या स्वच्छता मोहीम जोरात चालू आहे. पण ‘दिव्याखाली अंधार म्हणतात’ तसेच नेमके सीपीआरच्या बाबतीत झाले आहे. जेथे रुग्णांवर उपचार केले जातात तेथेच अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य दिसून येते.

सीपीआरमध्ये अपघात विभाग आणि पोलीस चौकी यामध्ये एक स्वच्छतागृह आहे. सदरच्या स्वच्छतागृहाची दररोज स्वच्छता होत नसल्यामुळे तसेच ते बंधिस्त नसलेमुळे याची दुर्गंधी आजूबाजूला सर्वत्र पसरलेली असते. याचा सर्वात जास्त त्रास अपघात विभाग आणि पोलीस चौकीतील सर्व कर्मचा-याना होतो. याचा परिणाम हा सर्व रुग्णांवर सुद्धा होतो. या स्वच्छतागृहाला लागून हिरव्या कपड्याने झाकलेली एक अडगळीची खोली आहे.

या अडगळीच्या खोलीमध्ये रुग्णांनी वापरलेली टाकाऊ फडकी,  चादरी, प्लास्टिक साठलेले आहे. ही घाण डासांचे साम्राज्य निर्माण करून डेंग्यूसारखा रोग व्हायला कारणीभूत आहे. सध्या कोल्हापुरात डेंग्यूची साथ जोरात चालू आहे. कळंबामध्ये डेंग्यूमुळे एक रुग्णही दगावलेला आहे. इतके सर्व असताना आणि रुग्णांनी वेळोवेळी सांगूनसुद्धा सीपीआर प्रशासनाला सीपीआरमधील स्वच्छतेचे काहीही देणेघेणे नाही असे दिसून येते.

सदरच्या स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि आजूबाजूचे कर्मचारी यांना याचा अतिशय त्रास होत आहे तरी सीपीआर प्रशासनाने सीपीआर स्वच्छतागृहावर त्वरित ठोस उपाय करावा अशी मागणी सर्वांकडून होत आहे.

450 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा