Breaking News

 

 

रामजन्मभूमी – बाबरी मशीद प्रकरणी २५ जुलैपासून सुनावणी : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादातून तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल सादर करावा, अन्यथा, २५ जुलैपासून सुनावणीला सुरूवात होईल, असे आज (गुरुवार) सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

मध्यस्थांच्या समितीने या प्रकरणाचा अहवाल कोर्टापुढे येत्या गुरुवारपर्यंत सादर करावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मध्यस्थांनी अहवाल सादर केल्यानंतर तो समाधानकारक नाही असे निदर्शनास आले तर, २५ जुलैनंतर रोज या प्रकरणाची सुनावणी चालणार आहे. याचाच अर्थ मध्यस्थांची समिती राहणार की नाही याचा निर्णय १८ जुलै रोजी होणार आहे.

342 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा