Breaking News

 

 

‘मल्टीस्टेट’संबंधी नेत्यांनी बोलावली ‘गोकुळ’च्या संचालकांची बैठक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’च्या मल्टीस्टेटवरुन जिल्ह्यातल्या राजकारणात रण पेटले आहे. संचालक अरुण डोंगळे यांनी लोकभावनांचे कारण पुढे करुन या मुद्द्याला तोंड फोडले आहे. आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गोकुळचे नेते माजी आ. महादेवराव महाडिक आणि माजी आ. पी.एन. पाटील यांनी संचालक मंडळाची उद्या (गुरुवार) बैठक सायंकाळी चार वाजता बोलावली आहे. ताराबाई पार्क येथील कार्यालयात उद्या दुपारी ही बैठक होणार आहे. या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

ऐन पावसाळ्यात गोकुळच्या मल्टीस्टेट मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळचे नेते आणि संचालक मंडळ मल्टीस्टेटच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्याला जिल्ह्यातील बहुतेक अन्य नेत्यांचा विरोध आहे. याच मुद्द्यावरुन लोकसभेची निवडणूक गाजली. गोकुळला मल्टीस्टेटचा दर्जा देणार नाही, अशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केली. त्यामुळे हा मुद्दा थंड पडला असे वाटत होते. गोकुळ मल्टीस्टेट व्हावा, यासाठी सरकार दरबारी गुपचूप हालचाली सुरु होत्या. सध्या विधानसभेच्या निवडणूकीचे पडघम् वाजू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर संचालक अरुण डोंगळे यांनी मल्टीस्टेट फायद्याचे असले तरी नेते सर्वसामान्यांना ते पटवून देण्यात अपयशी ठरले. असा आरोप करत लोकभावनेचा विचार करुन आपण लोकांच्याबरोबर आहोत. त्यासाठी संचालक पदाचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

त्यानंतर मल्टीस्टेटला विरोधक करणाऱ्यांनी पुन्हा एकदा तोंड उघडले. आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी यांच्यासह इतरांनीही नेते आणि संचालकांवर तोंडसुख घेतले. या सगळ्यांचा परिणाम म्हणून उद्या माजी आ. महाडिक आणि माजी आ. पी.एन.पाटील यांनी संचालक मंडळाची महत्वाची बैठक बोलावली आहे. मल्टीस्टेट होण्यासाठी दिलेल्या प्रस्तावात कर्नाटकातील केवळ तालुक्यांचा समावेश केल्याने तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. असा नवाच मुद्दा समोर आल्याने ही बैठक आयोजीत केल्याचे सांगण्यात येते.

मात्र प्रत्यक्ष बैठकीत काय चर्चा होणार ? आणि काय निर्णय होणार ? याकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

2,076 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा