Breaking News

 

 

केएमटी चालकास मारहाण प्रकरणी एकास तीन महिन्याची शिक्षा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केएमटीच्या चालकास मारहाण केल्याप्रकरणी किशोर विश्वास आयरेकर (वय २२, रा. रुकडी) याला आज (बुधवार) जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.पी. देशमुख यांनी १७ हजार ५०० रुपयांचा दंड आणि तीन महिने शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे अॅड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ऑक्टोबर २०१३ मध्ये केएमटीचे चालक सिताराम सलगर हे बस घेऊन गांधीनगरहून कोल्हापूरकडे येत होते. यावेळी आयरेकर हा दुचाकीवरुन विरुद्ध दिशेने येत होता. बसचालकाने साईड दिली नाही म्हणून आपली दुचाकी आडवी मारुन सलगर यांना मारहाण केली. त्यांनी त्याच्याविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण आणि शासकीय कामात अडथळा या आरोपाखाली हा खटला चालला.

प्रारंभी हा खटला प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल झाला. मात्र नंतर भा.दं.वि. कलम ३३२ आणि ३५३ मध्ये बदल झाल्याने  हा खटला सत्र न्यायालयात चालवण्यात आला. साक्षीपुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आयरेकर याला शिक्षा ठोठावली.

सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याबद्दल सत्र न्यायालयाने शिक्षा देण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस हवालदार श्यामराव नेभापूरे यांनी केला होता.

471 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा