Breaking News

 

 

वाघबीळनजीक कार दरीत कोसळली : दोघे जखमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे निघालेली कार वाघबीळनजीकच्या दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. विश्वजीत सुनील सूर्यवंशी (वय २०) आणि संजय नामदेव पाटील (१९, दोघेही रा. गारगोटी) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले असून विश्वजित याची प्रकृती गंभीर आहे.

सूर्यवंशी व पाटील हे दोघेही स्विफ्ट डिझायरमधून पन्हाळ्याकडे चालले होते. आज (बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास वाघबीळ घाटात आले असता टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार थेट ८० फूट दरीत कोसळली. या दोन्ही तरुणांनी सीटबेल्ट वापरल्यामुळे अपघातानंतर दोन्ही एअरबॅग उघडल्या आणि या दोन तरुणांचा जीव वाचला. मात्र विश्वजित गंभीर जखमी झाला आहे. डॉ. अभिजित जाधव आणि अमर पाटील कोडोली यांनी लोकांच्या मदतीने त्यांना दरीतून बाहेर काढले.

924 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा