Breaking News

 

 

‘ट्रेल हंटर्स’च्या सदस्यांनी सायकलवरून १० तासांत केली टोप-पंढरपूर वारी…

टोप (प्रतिनिधी) : वारकऱ्यांना जशी आषाढी वारीची आस लागते तशीच पेठवडगावातील ट्रेल हंटर्स ग्रुपच्या सदस्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागते. यातूनच या ग्रुपच्या १० सदस्यांनी टोप – पेठवडगाव ते पंढरपूर हा १७० किलोमीटरचा प्रवास सायकलवरुन १० तासात पूर्ण करून विठ्ठलाचे दर्शन घेतले.

पेठ वडगाव, किणी येथील डॉक्टर व सदस्य एकत्रित येऊन हा ग्रुप तयार झाला आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे, त्यांना व्यायामाची सवय लागावी. मन, मेंदू आणि मनगट बळकट व्हावे, पर्यावरणविषयी जागृती व्हावी. यासाठी या ग्रुपने आजपर्यंत दांडेली, गोवा, हुबळी, तारकर्ली, मार्लेश्वर, बोरबेट असा सायकल वरून प्रवास केला आहे. ट्रेल हंटर्स ग्रुपचे सदस्य दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर सायकलिंग करत असतात. याद्वारे आरोग्य निरोगी राहावे, इंधन बचतीचा संदेशही देण्यात येतो. यामधील एक ग्रुप पंढरीची वारी सायकलवरुन करतो. मागील दोन वर्षांपासून हा त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.

यंदाही पं. स. सदस्य डॉ. प्रदीप पाटील, डॉ. मिलिंद कुंभार, डॉ. अभय पाटील, डॉ. अमित सूर्यवंशी, डॉ. शशिकांत कुंभार, अभिजीत शिंदे, बाजीराव मिसाळ, पवन जंगम, केतन पाटील, आदित्य पाटील यांनी टोप ते आष्टा, भिलवडी, तासगाव, आटपाडी, दिघंची, महूद मार्गे पंढरपूर हे अंतर १० तासांत पूर्ण केले. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने आयोजित सायकल रॅलीत सहभाग नोंदविला होता. त्याचबरोबर ग्रामीण भागात इंधन बचतीचा संदेश पोहोचावा यासाठी पेठवडगाव येथे सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

1,560 total views, 3 views today

2 thoughts on “‘ट्रेल हंटर्स’च्या सदस्यांनी सायकलवरून १० तासांत केली टोप-पंढरपूर वारी…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा