Breaking News

 

 

विश्व हिंदू परिषदतर्फे अमरनाथ यात्रा : रणजितसिंह घाटगे

कोल्हापूर : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने अमरनाथ सह बुडा-अमरनाथ या दोन्ही ठिकाणी धार्मिक यात्रांना मोठा प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रातील भक्तांसाठी पुणे अमरनाथ पुणे अशी ही सहल अवघ्या सात हजारात उपलब्ध, असल्याची माहिती अॅड. रणजितसिंह घाटगे यांनी दिली.

घाटगे म्हणाले, सन १९८६ दरम्यान अतिरेकांचा प्रचंड प्रभाव असताना पाकिस्तान सीमेलगतच्या राजुरी तालुक्यात बंढी गावामध्ये असणाऱ्या बुढा अमरनाथ मंदिरात विश्व हिंदू  परिषेदेने ही यात्रा सुत्रबद्धपद्धतीने सुरु केली आहे. येथील एक टक्केच उरलेल्या हिंदू नागरीकांना मोठा दिलासा दिला आहे. तर सन २००५ पासून नियामितपणे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या यात्रेचे आयोजन करत आहेत.

इतर व्यावसायिक ट्रॅव्ह्ल्स कंपन्याच्या तुलनेत अगदी नाममात्र शुल्कामध्ये रेल्वे, लक्झरी प्रवासाचे नियोजन केले जाते. त्यामुळे मोठा प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रतून पहिली तुकडी पुण्यातून जाणार आहे. या यात्रेत सुमारे एक लाख भाविक सहभागी होत असल्याचे सांगिले.

याची नोंदणी स्थानिक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यालय (कोल्हापूर), कमल कुंज (खासबाग रिक्षा स्टॉपजवळ, मंगळवारपेठ) करावी, असे आवाहन अॅड. रणजितसिंह घाटगे यांनी केले.    

231 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा