Breaking News

 

 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी किरण लोहार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी किरण लोहार यांची निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी एक जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार काम पाहणार आहेत.

या निवडीमध्ये वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा. वर्षा बनसोडे आणि प्रा. प्रभाकर हेरवाडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी किरण लोहार यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

138 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा