Breaking News

 

 

मुंबई पोलिसांकडून डी. के. शिवकुमार, मिलिंद देवरा स्थानबद्ध

मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी बंगळुरहून आलेले डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानबद्ध केलेल्या नेत्यांना कलिना गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी नेले आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

कर्नाटकातील बंडखोर आमदार रनेसान्स हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. शिवकुमार यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका असल्याचे बंडखोर आमदारांनी म्हटल्यानंतर  हॉटेल बाहेर शिवकुमार यांना पोलिसांनी अडवल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तर, दुसरीकडे बंगळुरातील गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस नेत्यांना राजभवनजवळ निषेध करताना अटक करण्यात आले आहे. शिवाय पोलिसांनी या परिसरात संचार बंदी देखील लागू केली होती.

864 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा