Breaking News

 

 

प्रशिक्षकाने कल्पकता वाढविण्याची गरज : ज्यो रिबेलो

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : इंटरनेटमुळे  आपण कोणत्याही प्रशिक्षणाची माहिती घेऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंनाही याचा फायदा मिळाला आहे. परिणामी, प्रशिक्षकाची जबाबदारी वाढली असून कल्पकता वाढविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन ब्रिटिश कौन्सिलच्या प्रशिक्षक निर्देशक ज्यो रिबेलो यांनी केले.

ब्रिटिश कौन्सिल आणि येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत फुटबॉल प्रशिक्षकासाठी प्रिमियर स्किल्स ही दोन दिवसांची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत कोल्हापूर, मिरज, सोलापूर, निपाणी, गारगोटी येथील २४ प्रशिक्षक सहभागी झाले होते. सहभागी प्रशिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी रिबोलो म्हणाले,  प्रशिक्षणात रोज शेकडो नव्या युक्ती येत आहेत. त्यासाठी प्रशिक्षकाने अपडेट राहणे आवश्यक आहे. शारिरीक तंदुरुस्ती, डावपेच, कौशल्ये यावर आधारित सराव हवा. 

युनायटेडचे संचालक प्रशांत दडडीकर, श्याम गवाली, संभाजीराव शिवारे, प्रशिक्षक राजू कांबळे, सचिन फुटाणकर,विनय हत्ती, शकील पटेल, ओंकार जाधव, भूपेंद्र कोळी यांच्यासह खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते.

465 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा