Breaking News

 

 

वर्षभरात राज्यात ६५९ बालकांना ‘टीबी’ची लागण…

मुंबई (प्रतिनिधी) :  टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यातच राज्यात बालकांवर क्षयरोगाचे संकट ओढवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षभरात राज्यात ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेनी विधान परिषदेत हा अहवाल सादर केला होता. बालकांमध्ये क्षयरोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून, या संदर्भात जनजागृतीची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच देशभरात टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत असून, यामध्ये बालकांचा समावेश लक्षणीय आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या अहवालानुसार, राज्यात मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे म्हटले आहे. या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.  मात्र, त्या अनेक रुग्णांपर्यंत योजना पोहोचत नसल्याने क्षय रोगाचे हे संकट ओढावल्याचे सांगण्यात आले.

291 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा