Breaking News

 

 

बांगलादेशने वर्ल्ड कपमधील अपयशाचे खापर फोडले मुख्य प्रशिक्षकावर…

लंडन (वृत्तसंस्था) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाला अपयशाचा सामना करावा लागला. याचे खापर संघाने आणि मंडळाने मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह ऱ्होड्स यांच्यावर फोडले आहे. एकमताने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ऱ्होड्स यांना कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच मायदेशी परतावे लागणार आहे.

(जाहिरात – आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

२५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर  फोन – (०२३१) २६२७५७९)

२०१८ च्या जूनमध्ये स्टीव्ह ऱ्होड्स यांची बांगलादेशच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली होती. ऱ्होड्स ही जबाबदारी पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत सांभाळणार होते. पण हा करार संपवण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि ऱ्होड्स यांनी एकमताने घेतला. विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडताच बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श आणि फिरकीचे प्रशिक्षक सुनील जोशी यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तर, संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक नील मॅकेंझी सुट्टीवर गेले आहेत.

बांगलादेशची कामगिरी यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चांगली झाली होती. ‘जायंट किलर’ म्हणून ओळख असलेल्या या संघाने सर्वांना प्रभावित केले होते. पण उपांत्य फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गुणतालिकेत बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. ९ सामन्यामध्ये त्यांनी ३ विजय मिळवले आहेत.

372 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा