Breaking News

 

 

बॉम्बमधील शिसे काढायला गेले अन् प्राणाला मुकले…

नगर (प्रतिनिधी) : लष्करी सराव झाल्यानंतर टाकून देण्यात आलेल्या बॉम्बमधील शिसे काढत असताना त्याचा स्फोट होऊन दोन तरुणांच्या देहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्याची दुर्घटना नगरजवळील केके रेंज येथे घडली आहे. अक्षय नवनाथ गायकवाड (वय १९) आणि संदीप भाऊसाहेब तिरवडे (३२, दोघेही रा. खारे कर्जुने) अशी त्यांची नावे असून हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा याची नोंद एमआयडीसी पोलिसांत झाली आहे.

नगरच्या खारे कर्जुने गावाजवळ लष्कराचे के. के. रेंज आहे. येथे लष्कराकडून युद्धसाहित्यासह सराव केला जातो. सरावादरम्यान बॉम्बसह इतर घातक शस्त्रांचा वापर करण्यात येतो. लष्कराकडून निकामी झालेले बॉम्ब तिथेच टाकून दिले जातात. हे साहित्य गोळा करण्याचे टेंडर एका संस्थेला देण्यात आले आहे. निकामी झालेल्या बॉम्बमधील शिसे काढून त्यांची विक्री केली जाते. या शिशाला बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. त्यामुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त धोका पत्करून निकामी बॉम्बमधील शिसे वेगळे काढण्याचा अनेकजण करीत असतात.

लष्कराचा सराव संपल्यानंतर काल रात्री अक्षय आणि संदीप हे के. के. रेंजमध्ये गेले होते. त्यांना एक बॉम्ब सापडला. तो बॉम्ब निकामी असल्याचे समजून त्यांनी त्यातून शिसे काढण्याचा खटाटोप सुरू केला. मात्र दुर्दैवाने हा बॉम्ब जिवंत होता. त्याचा स्फोट झाला. तो इतका भयानक होता की, अक्षय आणि संदीप यांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. सभोवतीच्या इमारतींच्या काही भिंतीना तडे गेले. या दुर्दैवी प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा