Breaking News

 

 

पत्रकाराचा अपमान करणे कंगनाला पडले महागात…

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेलने पत्रकारांना अपशब्द वापरले. हे कृत्य त्यांना आता चांगलेच महागात पडले आहे. ‘गिल्ड ऑफ इंडिया’ने कंगनाचा चित्रपट ‘जजमेंटल है क्या’ च्या वृत्तांकनावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकाराला खूपच सुनावले होते. यानंतर तिच्या बहिणीनेही मीडियाविरुद्ध ट्विटरवर गरळ ओकली होती.

(जाहिरात – शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो,

आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

आता मात्र Entertainment Journalists’ Guild of India नावाच्या संस्थेने प्रोड्यूसर एकता कपूरला एक लिहिलेल्या पत्रात चित्रपटावर पूर्णपणे बहिष्कार घालत असून कोणतेही वृत्तांकन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. ‘जजमेंटल है क्या’ च्या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये तिने केलेल्या अनुचित वर्तनाची निंदा करण्याची केली आहे. तुमच्या टीमने आम्हाला अंधेरीमध्ये तुमचा एक इव्हेन्ट कव्हर करण्याची रिक्वेस्ट केली होती. या इव्हेन्टमध्ये कंगना रनोट जी राजकुमार रावसोबत होती, आमच्या एका पत्रकारावर खूप भडकली. जेव्हा की, त्याचा प्रश्न पूर्णदेखील झाला नव्हता. तुम्ही त्या इव्हेंटमध्ये स्वतः उपस्थित होता. आम्हाला या प्रकरणी तुमच्याकडून एक लिखित स्टेटमेंट आणि कंगनाने केलेल्या वर्तनाची निंदा करण्याची मागणी करत आहोत.

975 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा