Breaking News

 

 

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, युनोने कारवाई करावी : भारताची मागणी

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही पाकिस्तानमध्ये त्याला सुरक्षित आसरा दिला जात आहे. यावर संयुक्त राष्ट्रांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे. युनायटेड नेशन्य (यूएन)च्या सुरक्षा परिषदेतील बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली आहे. 

(जाहिरात – आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

२५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर  फोन – (०२३१) २६२७५७९)

दाऊद इब्राहिम हा केवळ भारतासाठी धोकादायक नसून त्याने त्याच्या डी कंपनीचे गुन्हेगारी जाळं जगभरातही पसरलेले आहे. अनेक गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना तो प्रवृत्त करत आहे, तसेच त्याचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचेही भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे.

जागतिक स्तरावर दहशतवाद आणि संघटीत गुन्हेगारीचा प्रयत्न दाऊदच्या डी कंपनी गॅंगकडून केला जात आहे. हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आणि जागतिक शांततेसाठी तसेच सुरक्षेसाठी धोकादायक आहे. तरीही जगात डी कंपनीचे धोकादायक दहशतवादी जाळे पसरण्याचे काम सुरुच असल्याची सविस्तर माहिती भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिली आहे.

435 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा