Breaking News

 

 

विश्वचषक क्रिकेट : भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज !

मँचेस्टर (वृत्तसंस्था) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाने खोडा घातल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. न्यूझीलंडचा पहिला डावही पूर्ण होऊ शकला नाही. आज या सामन्याला पुन्हा सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजही पाऊस होणार असला तरी तो कालच्याप्रमाणे मुसळधार होणार नाही. त्यामुळे सामना निकाली होईल, अशी अपेक्षा क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केली आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना आज खेळवला जाईल. आजही मँचेस्टरच्या मैदानावर पाऊस हजेरी लावणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आजच्या दिवसाच्या खेळात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे डकवर्थ लुईसचा आधार न घेता सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या खेळादरम्यान ४६.१ षटकानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावली. या दरम्यान न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांपर्यंत मजल मारली होती.

2,898 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा