Breaking News

 

 

कर्नाटकच्या काँग्रेस नेत्यांना मुंबई पोलिसांनी रोखले तर बंडखोरांना पुरवली सुरक्षा…

मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकच्या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. शिवकुमार हॉटेल परिसरातही पोहोचले मात्र, त्यांना या आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान, आमदारांच्या विनंतीनुसार, हॉटेलबाहेर एसआरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क कराफोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)


सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईतल्या पवई येथील रेनेसाँ हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते शिवकुमार मुंबईत येत असल्याची खबर मिळताच बंडखोर आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनना पत्र लिहून आपल्याला या नेत्यांची भिती वाटत असून आम्हाला त्यांची भेट घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, अशी विनंती केली होती.

आमदारांच्या या विनंती पत्रानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. रेनेसाँ हॉटेलबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १० आमदारांनी सुरक्षेची विनंती केल्यानंतर एसआरपीएफ आणि आरएएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे देखील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

1,017 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा