Breaking News

 

 

घोटवडेजवळ डम्पर- जीप अपघातात ४ ठार, ११ जखमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी रस्त्यावर घोटवडेनजीक डम्पर (एमएच – ०९ ईएम ४५८४) व जीप (एमएच –  ०९ ईयु ४७४४) यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. सकाळी ७ च्या सुमारास झालेल्या या अपघातात ४ जण ठार तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघातामध्ये क्रुझर चालक साताप्पा गुरव (रा. सोन्याची शिरोली ) आणि क्रुझर मालक प्रकाश एकावडे ( रा.पिरळ ) यांचा जागीच दुर्देवी अंत झाला. उपचाराचारा दरम्यान ऋषिकेश राजेंद्र पाटील, कृष्णात दिनकर गुरव यांचा अपघातात मृत्यू झाला. जखमींची नावे अशी : उत्तम तिबिले (रा. आणाजे), रामचंद्र पेंडे, रंगराव चौगले, सुरज पाटील, संदीप पाटील, राहुल पाटील, अमित चौगले, साताप्पा चौगले, सागर पाटील, अमोल आसनेकर सर्व रा. पिरळ).

घोटवडे गावानजीक स्वयंभू गणेश मंदिर आहे. या मंदिरानजीक डम्पर आणि जीप यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यामुळे मोठा आवाज झाला. महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच शेताकडे जात असलेल्या लोकांनी अपघातातील जखमींना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. अपघातनंतर जखमी आणि मृत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघाताचे दृश्य भीषण होते.

जीपमध्ये एकूण १६ प्रवासी होते. अपघाताचे वृत्त कळताच नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. या जीपमधील प्रवासी गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील विविध कारखान्यात काम करणारे कर्मचारी आहेत. ते सर्वजण राधानगरी तालुक्यातील पिरळ, शिरोली, तारळे, कुडूत्री, आणाजे, आवळी परिसरातील आहेत.

अपघाताचे वृत्त कळताच राधानगरी पोलीस तसेच इस्पुर्ली, राशिवडे व राधानगरी येथील अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. त्यातुनच जखमींना सीपीआरमध्ये आणण्यात आले. अपघातानंतर गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सीपीआरमध्ये येवून जखमींची चौकशी केली.

13,376 total views, 9 views today

One thought on “घोटवडेजवळ डम्पर- जीप अपघातात ४ ठार, ११ जखमी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा