Breaking News

 

 

‘ह्युंडाई’ने बाजारपेठेत आणली पहिली इलेक्ट्रिक कार…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने इंधन आयातीच्या खर्चात बचत होण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. विख्यात बहुराष्ट्रीय कंपनी ह्युंडाई मोटर्सने आज भारतीय बाजारपेठेत ह्युंडाई कोना ही नवीन इलेक्ट्रिक कार सादर केली. कंपनीची ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे.

एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल ४५२ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करु शकते, असा कंपनीचा दावा आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या मॉडलप्रमाणेच आहे. व्हाईट, सिल्वर, ब्ल्यू आणि ब्लॅक अशा 4 रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे. अवघ्या ९.७ सेकंदांमध्ये ही कार ० से १००किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते असा कंपनीचा दावा आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल ४५२ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करु शकते, असाही दावा कंपनीने केला आहे.

डीसी फास्ट चार्जरद्वारे ही कार अवघ्या ५७ मिनिटांत ८० टक्के चार्ज होते. कंपनी या कारसह होम चार्जरदेखील देणार असून ग्राहकांसाठी डिलरशीपमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील. चार मोठ्या शहरांतील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ देखील चार्जिंग स्टेशन उभारले जातील. सामान्य चार्जरने 6 तास 10 मिनिटांमध्ये ही कार पूर्ण चार्ज होते. या कारची एक्स-शोरुम किंमत २५.३०  लाख रुपये आहे.

1,704 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा