Breaking News

 

 

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविड

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

बीसीसीआयने सांगितले आहे की, राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटशी संबंधित सगळ्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. यामध्ये उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सल्ला देणे, त्यांना प्रशिक्षण तसेच सपोर्ट स्टाफनाही प्रशिक्षण, पुरुष आणि महिला टीमचे मुख्य प्रशिक्षक (भारत ए, भारत अंडर-१९, भारत अंडर-२३) यांच्यासोबत उदयोन्मुख खेळाडूंच्या प्रशिक्षण देणार आहे. याआधी राहुल द्रविड भारताच्या अंडर-१९ टीमचा प्रशिक्षक होता. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना टीम इंडियाने अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता.

234 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा